Breaking News

आगामी लोकसभा पुन्हा बारामतीतून : ना. जानकर

फलटण, दि. 17 (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी यापुढे रासप काम करणार असून आगामी लोकसभा निवडणूक बारामती मतदार संघातूनच लढवणार असल्याचे पशू व संवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी फलटण येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्य शासनाच्या माध्यमातून हाताळत असून आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, अशी ग्वाही जानकर यांनी दिली. ना. महादेव जानगर सातारा जिल्हा दौर्‍यावर असून ते फलटण येथे मुक्कामी होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ना. जानकर म्हणाले, यापुढे ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून रासप काम करणार आहे. कोणाचाही चमचा म्हणून काम न करता स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. राज्य सरकार शेतकरी वर्गासाठी काम करत असून दुधाचे दर टप्प्या-टप्याने 6 रुपयांनी वाढवले. यामुळे पशूसंवर्धन व दुग्ध विकास खाते एक नंबर झाले आहे.