मायकल क्लार्क आणि पीटरसन आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत
मुंबई, दि. 05 - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आयपीएलच्या दहाव्या मोसमात नव्या भूमिकेत दिसणार आहे. क्लार्क सुनिल गावसकर, केविन पीटरसन यांच्या पॅनलसोबत समालोचन करताना दिसणार आहे. 47 दिवस चालणार्या आयपीएलच्या दहाव्या मोसमात दहा ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. जवळपास 20 समालोचकांकडून आयपीएल 10 ऐकायला मिळणार आहे. क्लार्क नुकत्याच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेतही समालोचन करताना पाहायला मिळाला होता.
एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र यावेळी आता समालोचन करण्यासाठी उत्सुक आहे, असं मायकल क्लार्कने सांगितलं. 5 एप्रिलपासून सुरु होणार्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. ही स्पर्धा 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येतील. प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यापैकी सात सामने संघाच्या होम ग्राऊंडवर होतील. 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने रात्री 8 वाजता आयपीएल 10 ला सुरुवात होईल.