Breaking News

‘भीम’ अ‍ॅप आता मराठीतही!

मुंबई, दि. 16 - ऑनलाईन व्यवहारांसाठी केंद्राने लॉन्च केलेलं ‘भीम’ (भारत इंटरफेस फॉर मनी) अ‍ॅप आता मराठीतही उपलब्ध झालं आहे. देशातील तीन प्रादेशिक भाषांचा नव्याने समावेश केल्याने आता यामध्ये एकूण 12 भाषा झाल्या आहेत.
नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने ‘भीम’ अ‍ॅपचं अपग्रेड व्हर्जन लॉन्च केलं. ‘भीम 1.3’ हे नवं व्हर्जन अँड्रॉईड आणि आयओएस यूझर्ससाठी असून, तीन नवीन फीचर्सचा यात समाविष्ट करण्यात आले आहेत.