Breaking News

फेसबुकची 30 हजार बनावट अकाऊंट बंद!

मुंबई, दि. 16 - फ्रान्समध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने तब्बल 30 हजार बनावट अकाऊंट बंद केले आहेत. चुकीच्या आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या पसरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अफवा, भ्रम आणि दिशाभूल करणारे बनावट फेसबुक अकाऊंट बंद करण्याला आमचं प्राधान्य आहे. आम्ही सर्वच अकाऊंट सध्या बंद करु शकलो नसलो, तरी आम्ही चांगलं काम करत आहोत असं फेसबुकने म्हटलं आहे. जे अकाऊंट बंद केले आहेत, ते आमच्या रडारवर होते. ते फेक अर्थात बनावट असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असंही स्पष्टीकरण फेसबुकने दिलं आहे. बनावट अकाऊंट बंद केल्यामुळे खोट्या बातम्या, धोकेबाजी आणि राजकीय ट्रोलिंगला आळा बसेल, असंही फेसबुकने म्हटलं आहे.