श्रीराम नवमीनिमीत्त आयोजित शिबीरात 51 जनांनी केले रक्तदान
लातूर, दि. 08 - ये़थील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयांतर्गत असलेली श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी व स्वयंभू मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमी निमीत्त सोमवारी शहरातील केशवराज मंदिर, राम गल्ली येथे आयोजित रक्तदान शिबीरात 51 जनांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीरात ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस होल्डर 2013 पुरस्कारा’चे विजेते व ज्यांनी भारतात सर्वाधिक वेळेस रक्तदान केले ते श्री पारस चापसी यांनी यावेळी 131 वे रक्तदान केले. चापसी हे 65 वर्षाचे असून त्यांचे हे शेवटचे रक्तदान होते. या रक्तदान शिबीरासाठी स्वयंभू मित्र मंडळाच्या पदाधिकार्यांनी पुढाकार व परिश्रम घेतले.
या रक्तदान शिबीरात श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढीच्या रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. मिना सोनवणे, डॉ. बी. डी. दाताळ, डॉ. अश्विनी शिलेदार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता भागवते, तंत्रज्ञ ए. टी. वाघचौरे, विकास करंजे, शिवाजी जवादे, परिचारीका पद्मा बिडवे, संगीता सिरसाट, रामचंद्र कराड, बालाजी गायकवाड यांनी काम पाहिले.