Breaking News

राज्यासह देशभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

शहर जिल्हा व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सामाजिक न्यायविभागाच्या वतीने
। डॉ. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळा उभारणीच्या जागेसाठी आमदार जगताप यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर, दि. 15 - राज्यासह देशभरामध्ये शुक्रवारी भारतरत्न डॉ.बाबासासहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरामध्ये विविध ठिकाणी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. शहरातील चौका चौकात आज भिमरायांच्या गितांचा आवाज ऐकु येत होता. विविध ठिकाणी जयंती निमित्त मोठ मोठे फ्लेक्स शहराच्या प्रमुख भागात लावण्यात आले होते. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ सुशोभिकरण करण्यात आले होते. गुरवार रात्री पासुनच  टाकुन या ठिकाणी गर्दी होताना दिसत होती. सायंकाळी या ठिकाणी विविध परिवर्तन चळवळींच्या पुस्तकांचीही मोठ्यज्ञा प्रमाणात विक्री झाली. 
महानरपालिका, जिल्हा परिषद आदिसह विविध शासकीय कार्यालयामध्येही आज डॉ.बाबासाहेबं यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या जिवणा विषयी माहिती देणारे माहिती पत्रिकेचे वाटप करण्यात आले होते.
रुपवते यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण तर निकम यांना अहमदनगर भुषण पुरस्कार प्रदान
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौक येथे आयोजित कार्यक्रमात शहर जिल्हा व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर रुपवते यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण तर जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने परिमल निकम यांना अहमदनगर भुषण पुरस्कार जिल्हाधिकारी अनिल कवडे, आ.संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हापोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठी, आयुक्त दिलीप गावडे, महापौर सुरेखा कदम, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, रेशमा आठरे, संजय झिंजे, उबेद शेख, नगरसेवक विपुल शेटीया, हनिफ जरीवाला, प्रकाश भागानगरे, पै.अंकुश मोहिते, मारुती पवार, अ‍ॅड.शारदा लगड, सौ.गवळी, संध्या मेढे, बाबासाहेब गाडळकर, साधना बोरुडे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होवून, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खर्‍या अर्थाने गरज आहे. जनसामान्यांच्या कल्याणासाठी रारज्यघटना असतित्वात आली. बाबासाहेबांनी विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली व अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. डॉ.बाबासाहेबांची जयंती ज्ञानदिनाने साजरी करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हापोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार डॉ.बाबासाहेबांच्या घटनेने सर्वसामान्यांना मिळाल्याचे सांगितले.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, युवकांना दिशा व प्रेरणा देण्यासाठी महामानवांच्या विचारांची गरज आहे. जयंती निमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे. डॉ.बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळा उभारणीसाठी शहराच्या चारही दिशांनी ओढाताण होत आहे. पुतळ्याच्या जागेचे निश्‍चितीकरण होत असून, अनेक शहरात मोठ्या महामार्गावर महापुरुषांचे पुतळे उभे करण्यात आले आहे. शहरातील नगर पुणे महामार्गावरील पशुवैद्यकिय चिकित्सालयाच्या जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी 10 गुठे जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली. पुतळा उभारणीच्या परवानगीसाठी शासनस्तरावर वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन आ.जगताप यांनी जिल्हाधिकारी कवडे यांना दिले. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उध्दव कालापहाड यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भीमप्रेमी उपस्थित होते.
पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या भिमशक्तीच्या मिरवणुकीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा जोतीराव फुले यांची जयंती भिमशक्तीच्या वतीने विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मार्केटयार्ड चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिमशक्तीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, नगरसेवक दत्ता कावरे, परिमल निकम, चंद्रकांत उजागरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कर्डक, जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोरुडे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुजय म्हस्के, संपर्क प्रमुख नाना जाधव, हर्षवर्धन जावळे, हेमंत आल्हाट, संजय कांबळे, नित्यानंद कांबळे, गौतम विधाते, कैसर सय्यद, सुशांत देवडे, रमेश कांबळे, सुबोध वाकचौरे, निलेश डोळस, किशोर वाघमारे, रावसाहेब आरु, सत्यम थोरवे, विनायक साठे, विलास भिंगारदिवे, अभय गायकवाड, मोहन साठे आदि उपस्थित होते.
सकाळी आंबेडकर चौक, हमालवाडा झेंडीगेट येथे फटाक्यांची आतषबाजी करुन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच वंचित घटकातील मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला. संध्याकाळी झेंडीगेट हमालवाडा येथून डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेसह बॅन्जो, बॅण्ड पथकसह मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. भिमशक्तीच्या वतीने फुले व आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यात विचारवंतांचे व्याख्याण, चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.