Breaking News

माण तालुक्यात जुगारासह दारू अड्ड्यांवर छापे

दहीवडी, दि. 17 (प्रतिनिधी) : माण तालुक्यात दहिवडी पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू व जुगार अड्ड्यावर छापे टाकून दारू, रोख रक्कम, दुचाकी व जुगाराचे साहित्य असे मिळून 39 हजार 549 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
भिमराव गणपत बोडरे, मारूती रामचंद्र पाटोळे हे दहिवडी महाविद्यालयासमोरून दुचाकीवरून अवैध दारू वाहतूक करत असल्याचा संशय आल्याने सहाय्यक फौजदार माने, मुळीक, बनसोडे, गोडसे, भंडारवाड यांनी गाडीचा पाठलाग करून त्यांच्याकडून 4 हजार 800 रुपयांची दारू तसेच 25 हजारांची मोटारसायकल (एमएच 11 सीडी 4209) असा 29 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच विनापरवाना चोरटी दारूविक्री प्रकरणी छापा टाकून दहिवडी येथील सुनिल किसन जाधव याच्याकडून 750 रुपयांची दारू व रोख 200, अनिल अशोक शानभाग याच्याकडून 1805 रुपये किंमतीची दारू, शिंगणापूर येथील महादेव उत्तम काळे याच्याकडून 1914 रूपये किंमतीची दारू, मलवडी, ता. माण येथील उमेश रघुनाथ माने याच्याकडून 750 रूपये किमतीची ब्रँण्डेड व साध्या प्रकारची दारू हस्तगत करून सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहिवडी ता. माण येथील मोरेमळा शेजारी जुगार अड्ड्यावर छापा टाकून संजय गुलाबराव अवघडे (गांधीनगर, दहिवडी), अविनाश धनाजी देवकर (विठोबानगर, दहिवडी), रामचंद्र सोपान आवटे (गांधीनगर, दहिवडी), विक्रम बाळासो जाधव, बाबा शंकर खरात (शिंदी बु।) यांच्याकडून रोख 4 हजार 300 रूपये व जुगाराचे साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.