Breaking News

अमेरिकेचा विरोध झुगारुन पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

प्योंगयांग, दि. 16 - अमेरिकेचा विरोध झुगारुन उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियानं 15 एप्रिलला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी, ही क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र उत्तर कोरीयाची ही चाचणी अयशस्वी ठरल्याचा दावा अमेरिका तसंच दक्षिण कोरीयानं केला आहे. क्षेपणास्त्र झेपावल्यानंतर लगेचच त्याचा स्फोट झाल्याचा दावा, अमेरिकेच्या संरक्षण विभागानं केला आहे.