स्वत: पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार : बच्चू कडू
मुंबई, दि. 24 - नाफेडच्या केंद्रांवर 48 तासात तूर खरेदी सुरु न झाल्यास मी स्वत: ट्रॅक्टरमध्ये बसून सहकार आणि पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
तूर खरेदीची मुदत संपल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने तूर खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. शेतकर्यांनी सर्व तहान-भूक विसरुन 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात सरकारी तूर खरेदी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रांबाहेर पाच ते सात किमीच्या ट्रॉलीच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.