22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रांवर आलेल्या तुरीचीच खरेदी : मुख्यमंत्री
नवी दिल्ली, दि. 24 - नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल होती. त्यामुळे 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकर्यांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी, बाहेरुन येणार्या तुरीवरील इम्पोर्ट ड्युटी 10 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांवर करावी आणि तूर खरेदीसाठी ठोस धोरण आखावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
रामविलास पासवान यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांही ही माहिती दिली. मात्र केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मागणीला कसा प्रतिसाद दिला आहे, ते अद्याप समजू शकलेलं नाही. 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकर्यांना टोकण मिळालेले आहेत, त्यांची तूर खरेदी केली जाईल. मात्र ज्यांच्याकडे टोकण नाहीत, त्या शेतकर्यांना व्यापार्यांनाच तूर विकावी लागणार आहे. व्यापार्यांकडे 4 हजार रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जाते. तर सरकारकडून नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांना 22 एप्रिलपर्यंत तूर नाफेडच्या केंद्रांवर आणता आली नाही, त्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.