Breaking News

रॉयल इंजिनीरिंग कंपनीला स्टार परफार्मस अवार्ड

अकोला, दि. 29 - स्थानीय दीपक चौक परिसरातील रायल इंजिनीअरिंग कंपनीचे संचालक कुशल प्रमोद गुप्ता यांना  विडॉल चा सन 16  -17 चा स्टार परफाँर्मन्स पुरस्कार मिळाला आहे.
मुबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या टाईड वॉटर ऑइल कंपनीच्या स्टॅटेजीक बिझिनेस मीट मध्ये गुप्ता याना टु व्हीलर श्रेणीमध्ये उल्लेखनीय ग्राहक सेवेबद्दल ’स्टार परफॉर्मन्स अवॉर्ड बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला. गुप्ता यांना यावेळी टाईड वॉटर ऑइल कंपनीचे एम डी आर एन घोषाल यांच्या उपस्थितीत कार्यकारी संचालक जे रमेश,क्षेत्रीय विपणन प्रभारी संदीप पाहूजा यांनी पुरस्कार व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव केला.यावेळी कंपनीचे जीसीएफओ सुप्रतीक बसू,विक्री व विपणन विभागाचे उपमहाव्यवस्थापक एन बॅनर्जी, क्षेत्रीय व्यवस्थापक विवेक नायर, व्यवस्थापक विश्राम गोडबोले  आदी मान्यवर उपस्थित होते. सन 99 पासून  रायल इंजिनीअरिंग कंपनीने सतत आठ वेळा हा पुरस्कार मिळवून पश्‍चिम विभागात विक्रम स्थापित केला आहे.या मेळाव्यात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातील कंपनीचे वितरक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मेळाव्यात गुप्ता यांनी आधुनिक वाहनांसाठी उपयुक्त अश्या विडॉल ची माहिती देत अश्या ऑइल ने वाहनांची कार्यक्षमता वाढत असल्याचे सांगितले. आपल्या या उपलब्धीचे श्रेय गुप्ता यांनी  टाईड वॉटर ऑइल कंपनीच्या व्यवस्थापन, अधिकारीवर्गासोबत काम करणार्‍या सर्व विक्री प्रतिनिधी, हेल्पर्स, रिटेलर्स, मेकॅनिक्स व ग्राहकांना दिले आहे.  या यशाबद्दल रॉयल इंजिनीरिंग कंपनीचे सर्वत्र कौतुक होत असून आमच्या प्रामाणिकता, सचोटी व तत्पर सेवेला मिळालेला हा पुरस्कार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.