Breaking News

अनेक गावात रोटरीचे फिरते नेत्र तपासणी अभियान जोमात

अकोला, दि. 29 - गत सात वर्षांपासून फिरत्या वाहनाद्वारे नेत्रतपासणी करणार्‍या रोटरी  फिरत्या नेत्रतपासणी पथकाच्या वतीने या एप्रिल महिन्यात अनेक गावात नेत्ररुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्रउपचार केले. 
रोटरी नॉर्थ च्या सहकार्याने आयोजित या पथकाने एक एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत अनेक गावात नेत्र शिबिरे घेऊन उपचार व नेत्र जनजागरण केले. परिसरातील डबडी, बहिरखेड, वारुळी, पडसोवळे, मजलापूर, कौलखेड, दाबकीरोड, बाळापूर, येळवण, दोनद, येवता, हिंगणी, चिंचोली, धाबा, अगीखेड, भूलगाव, देऊळगाव, शेगाव, टिटवान, कोथळी खुर्द, हातरून येथील  ग्रामपंचायत परिसरात मोफत नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आलीत.
या महिन्यात तब्बल बावीस  शिबिरे घेण्यात येऊन वरील गावातील एक हजार तीनशे तीस रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.  या मध्ये तीनशे तीनशे एकाहत्तर रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आलीत तर एक्केचाळीस  रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली.निवड झालेल्या मोतीबिंदू असणार्‍या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
रोटरी फिरत्या नेत्रतपासणी केंद्र प्रमुख डॉ जुगल चिरानिया यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक राजीव मेसे, गोपाळ डाबेराव यांनी कार्य केले. सहकार्य रोटरी नॉर्थ चे अध्यक्ष दीपक गोयनका, सचिव अविनाश डुडुळ, सहयोग समूहाचे डॉ श्याम पंडित, देवेंन  शाह, डॉ ओमप्रकाश साबू, विजय ठोसर समवेत वरील गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मेहनत घेतली.