ग्राहक जागृती मंचच्या जिल्हाध्यक्षपदी पै.नाना डोंगरे यांची नियुक्ती
अहमदनगर, दि. 09 - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील पै.नाना डोंगरे यांची ग्राहक जागृती मंचच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. मंचचे राज्याध्यक्ष पंडितराव लष्करे यांच्या हस्ते तर राज्य कार्याध्यक्ष नंदकुमार कुरुमकर, ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, समाजभुषण दादासाहेब शिरवाळे, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष साहेबराव बोडखे, गोकुळ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत डोंगरे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
पै.नाना डोंगरे यांचे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य चालू आहे. डोंगरे यांनी गावपातळीवर स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, युवा जागृती अभियान राबवून, स्त्री भ्रुणहत्या थांबवण्याकरिता व पर्यावरण रक्षणाकरिता केलेले जनजागृतीचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांना ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव व दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे राज्याध्यक्ष पंडित लष्करे यांनी सांगितले.