Breaking News

अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांकडून अटक

मुंबई, दि. 04 - अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. ‘रामायण’कार वाल्मिकींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. लुधियानाच्या न्यायालयाने राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानंतर पोलिसांचं एक पथक राखी सावंतला अटक करण्यासाठी लुधियानाहून मुंबईला आलं होतं.
भर पार्टीत गायक मिका सिंगनं राखी सावंतचं चुंबन घेतलं होतं. मात्र या घटनेला काही काळ उलटल्यानंतर मिका सिंगने राखीची माफी मागीतली होती. दरम्यान मागील वर्षी  राखीने मिकाला माफ केल्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी ऋषी वाल्मिकींचं उदाहरण दिलं होतं.  या टिप्पणीमुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर लुधियाना न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर न राहिल्याने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.