Breaking News

जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांना जिल्हा सहकारी बँकेत निरोप

बुलडाणा, दि. 30 -  बँकेचे प्राधिकृत अधिकारी, समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. विजय झाडे यांची क्रीडा आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यामुळे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला. निरोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात होते. तसेच प्रमुख उपस्थितीत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण चव्हाण, व्यवस्थापक विजय चिंचोले, मनिष ठाकरे, मुख्याधिकारी संतोष ठाकरे, एकनाथ गाढे, सोमीनाथ इथापे उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीत 31 मार्च 2017 अखेर किमान 9 टक्के सीआरएआर राखण्याचे फार मोठे आव्हान बँकेसमारे होते. हे प्रमाण राखण्यासाठी बँकेसमोर वसूली करणे हा एकच पर्याय होता. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना विश्‍वासात घेवून विजय झाडे यांनी कर्ज वसूली करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बँकेला 31 मार्च 2017 अखेर 10.84 टक्के सीआरएआर राखणे शक्य झाले. संचलन विजय चिंचोले यांनी तर आभार संतोष ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होता.