Breaking News

महाराष्ट्र जळत असतांना राजे ढोल वादनात व्यस्त!

दि. 19, एप्रिल - महाराष्ट्राला नानाविध समस्यांनी घेरलयं..नापिकी,शेतीवर होणारा खर्च भागेल इतकही उत्पन्न शेतकर्याच्या पदरात पडत नाही.बेरोजगारीने थैमान घातलयं.नापिकीने ञस्त झालेल्या,गरीबीने जीव घेतलेल्या बापाच्या डोक्यावर ओझं  नको म्हणून महाराष्ट्राच्या उपवर लेकी मृत्यूशीच विवाहबध्द होऊ लागल्यात.या सगळ्यांवर कळस म्हणजे शासकीय आणि सामाजिक पातळीवर आर्थिक नैतिक भ्रष्टाचाराने शिखर गाठले आहे.सामाजिक प्रश्‍नांनी ऊन्माद मांडलाय. महाराष्ट्र जळतोय अन् राजा ढोल बडवतो आहे.कुणी हातचं सोडून जनतेला पळत्याच्या मागे धावण्यास भाग पाडल जातयं. 
जनता पोटाला दोन वेळच्या भाकरीसाठी लागणारा आटा मागते आहे,राजा वायफायचा डाटा मोफत पुरवित आहे.उन वारा पाऊस थंडी पासून संरक्षण मिळेल एव्हढच डोक्यावर  छप्पर मिळावे अशी जनतेची अपेक्षा आहे ,राजा माञ अलिशान वातानुकुलीत स्वप्ने दाखवित आहे.रोजचा प्रवास सुखाचा व्हावा एव्हढीच अपेक्षा बाळगणार्या जनतेला बुलेट ट्रेन देऊ गेली जात आहे.रामराज्य निर्माण व्हावा असे स्वप्न प्रत्यक्षात आणू म्हणणार्या जनतेला राम मंदीर बांधण्याचे आश्‍वासन पुन्हा पुन्हा दिले जात आहे.
कुणब्याला त्याचा हक्क हवा आहे,घाम गाळून पिकवलेला शेतमाल पोटापुरता नफा मिळून विकला जाईल एव्हढीच त्याची अपेक्षा आहे.छञपतींच्या रयतेला स्वराज्याचे सुख हवं आहे.गडकिल्ले स्मारक म्हणून जपायचे आहे.म.फुलेंचा आसूड स्मरणात राखायचा आहे,डा,आंबेडकरांच्या लेखनीने साकारलेली न्यायिक समानता ऊभी करायची आहे.राजा माञ महापुरूषांना वाकुल्या दाखवून हजारो कोटींची स्मारके जनतेच्या छाताडावर ऊभी करू पहात आहे.
महाराष्ट्राच्या लेकींना गुण्या गोविंदाने फुललेला संसार बांधायचा आहे.राजा माञ हुंडा घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण करू पाहणार्या धेंडांना पोसते आहे.
बेरोजगारांना रोजगार हवा आहे.मुद्राला माञ तारण हवं आहे.राजा मेक इन इंडिया ,मेक इन महाराष्ट्र स्टार्ट अपचा ढोल बडवत आहे.शेतकर्याला मदतीचा हात हवा आहे ,लोकशाहीचा एक राजा माञ स्मारकांवर,बुलेट ट्रेनवर हजारो कोटींची खैरात करीत आहे.महाराष्ट्राला दारूबंदी हवी आहे,राजा माञ महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गळ्यात बांधीत आहे.लोकशाहीचा दुसरा राजा जनतेचे अश्रू पुसण्याचे ढोंग करून वातानुकुलीत संघर्षाची नौटंकी करीत ओल्या जखमांवर मीठ शिंपडत आहे.आणि लोकशाहीचा तिसरा राजा कथित समाजपुरूष समाजाची अस्मिता राजकारण्यांच्या खुंटीला घट्ट बांधू पहात आहेत.महाराष्ट्र भुकेने व्याकूळ असतांना सर्व शासकीय सोयी सवलती लाटून सरकारी खजिना साफ करण्यात राजे व्यस्त आहेत.
चंद्रकांत दादांना लोकमंथनचा सवाल
सार्वजनिक बांधकाम मंञ्यांना नक्की काय अपेक्षित आहे? बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार निपटून काढायचा की स्थानिक कंञाटदारांना उध्वस्त करायचं आहे? मध्य मुंबई ,शहर ईलाखा आणि उत्तर मुंबईतील टक्यांची मक्तेदारी संपवायची की ठेकेदारांना आत्महत्येस प्रवृत्त करायचे? लवकरच...
अखेर चोर सापडला......
मध्य मुंबई,शहर ईलाखा,आणि उत्तर मुंबई साबां मंडळात प्रचंड अनियमितता आहे असे लोकमंथनने वारंवार प्रसिध्द केले होते.लोकमंथनच्या दखलपाञ प्रसिध्दीनंतर विधान मंडळ अंदाज समितीचे सदस्य आ.चरण वाघमारे यांनी या गैरप्रकारांची तक्रार थेट मुख्यमंञ्यांकडे केली.लोकमंथन आणि आ.वाघमारे यांनी उपस्थित केलेला मुद्दा रास्त असल्याचे माहीती अधिकारात उघड झाले आहे,या एकुणच दारोडेखोरी लोकमंथनची विशेष दखल मालिका सोमवारपासून...