पहिली-दुसरीच्या चिमुकल्यांचे कौतुक करणे हे सर्वांचे कर्तव्यच - प्रा.खुराणा
अहमदनगर, दि. 09 - प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण जन्मत:च असतात पण ते आपल्याला दिसत नसतात या गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या यशाचे गमक कशात आहेत हे पाहणे गरजेचे आहे. श्रीनाथ विद्या मंदिरच्या 1 ली व 2 री च्या चिमुकल्यांनी गणित परिक्षेत द्वितीय-तृतीय असे क्रमांक मिळवून स्वत:च्या नावासह शाळेचे नाव उंचावले या सर्वांचे कौतुक करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे असे प्रतिपादन शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखाराणी खुराणा यांनी केले.
अशोकभाऊ फिरोदिया मेरिट फाऊंडेशन आयोजित गणित परिक्षेत श्रीनाथ विद्या मंदिर मधील 1 ली व 2 री च्या 12 विद्यार्थ्यांनी शहर गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे पुष्पगुच्छ, बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी श्रीमती खुराणा बोलत होत्या.
याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त रेखा पाऊलबुधे, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, उपमुख्याध्यापिका यन्नम, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती खुराणा पुढे म्हणाल्या, या चिमुकल्यांच्या पाठीवर शाबासकिची थाप दिली तर त्यांना प्रेरणा मिळते. गणित परिक्षेत इतक्या लहान वयात मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशात विद्यार्थ्यांचे कष्ट तर आहेतच पण मुख्याध्यापिका सिद्दम मॅडम, मार्गदर्शक शिक्षिका सौ.पवार, सौ.लटपटे, सौ.शिंदे यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.
विश्वस्त सौ.रेखा पाऊलबुधे यांनी यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे मनापासून कौतुक केले. संस्था अशा या विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी सैदेव प्रयत्नशिल असते. पालकांचे सर्व शिक्षकांचे सहकार्य असल्यानेच शाळा प्रगतीपथावर आहे. असे त्या म्हणाल्या मुख्याध्यापिका सिद्दम मॅडम, यन्नम मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली.
शहर गुणवत्ता यादीत इयत्ता 1 ली मधील श्रद्धा बुधवंत, वैभवी इंगळे, ऋषीकेश काकडे, श्रावणी गर्जे, सार्थक आव्हाड, शिवानी गवळी, अंजली घुले, मानसी कदम यांनी तर 2 री च्या अंतरा गवळी, मुग्धा तिरिद्दे, संध्या गाडेकर, साई कुमखेले या विद्यार्थ्यांनी द्वितीय, तृतीय, चौथा व पाचवा असे क्रमांक पटकाविले. या सर्व चिमुकल्यांना पुष्पगुच्छ, बक्षीसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना सौ.एम.पी.पवार, सौ.जे.आर लटपटे, सौ.एम.एम.शिंदे आदी शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष विनय पाऊलबुधे, विश्वस्त ए.आर.देशमुख, आर.डी.बुचकुल, बी.बी.सिद्दम, रघुनाथ कारमपुरी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
सुत्रसंचालन देवीदास बुधवंत यांनी केले. तर एम.एन.यन्नम यांनी आभार मानले.