राणा, बटलरची तुफानी खेळी, मुंबई इंडियन्सची पंजाबवर 8 विकेटनं मात
इंदौर, दि. 21 - पार्थिव पटेल, जोस बटलर, नितीश राणा आणि हार्दिक पंड्याच्या तुफान आतषबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबईचा आयपीएलच्या सहा सामन्यांमधला हा पाचवा विजय ठरला. जोस बटलरनं 37 चेंडूत तब्बल 77 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. तर नितेश राणानं 34 चेंडूत 62 धावा कुटल्या. या खेळीत त्याने तब्बल 7 षटकार ठोकले.
या सामन्यात हाशिम अमलाच्या नाबाद शतकाच्या जोरावर पंजाबनं मुंबईला विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या पहिल्या चारही फलंदाजांनी मिळवून अमलाचा हमला मामुली ठरवला. मुंबईच्या पहिल्या चार फलंदाजांनी मिळून तेरा चौकार आणि पंधरा षटकारांची उधळण केली. त्यामुळंच मुंबईला तब्बल 27 चेंडू आणि आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवता आला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना किंग्स इलेव्हनचा सलामीवीर हशिम अमलानं मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. अमलानं इंदूरच्या मैदानात 60 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली. त्यानं कर्णधार ग्लेन मॅक्सवेलच्या साथीनं तिसर्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारीही रचली. त्यात मॅक्सवेलचा वाटा होता 18 चेंडूंमधल्या 40 धावांचा. मॅक्सवेलनं या खेळीदरम्यान चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्यामुळेच किंग्स इलेव्हन पंजाबला 198 धावांचं आव्हान मुंबई इंडियन्ससमोर ठेवलं होतं. मात्र, जोस बटलरच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं हे आव्हान अवघ्या 15.3 षटकातच पूर्ण केलं.