शिरवळ येथे धूमस्टाईलने वृध्देचे 5 तोळ्याचे गंठण हिसकावले
शिरवळ, दि. 30 (प्रतिनिधी) : शिरवळ, ता. खंडाळा येथे यात्रेकरीता आलेली वृध्द महिला मिरवणूक पाहण्यास जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईलने वृध्देच्या गळ्यामधील 5 तोळ्याचे एक लाख किंमतीचे गंठण हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे शिरवळमध्ये खळबळ उडाली.
शारदा दत्तात्रय आरडे (वय 55, रा. वडगाव डाळाचे, ता. भोर, जि. पुणे) या शिरवळ येथील शिर्के कॉलनी येथे मुलगा अजित यांच्याकडे आल्या होत्या. यावेळी शारदा आरडे नात, सून व शेजारील महिलांसमवेत यात्रेनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक पाहण्याकरीता जात होत्या. त्याचवेळी केदारेश्वर मंदिराजवळ उतारावरून दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी शारदा आरडे यांना अडवत त्यांचे पाच तोळ्याचे सुमारे एक लाख किंमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून धूम स्टाईलने पलायन केले. यावेळी आरडे व इतरांनी आरडाओरडा केला परंतू, तोवर चोरटे पसार झाले होते. या घटनेची फिर्याद शिरवळ पोलीस स्टेशनला शारदा आरडे यांनी दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे करत आहे.