Breaking News

तोरणवाडा व धोत्रा भनगोजी विद्युत उपकेंद्राचे भुमीपूजन

बुलडाणा, दि. 23 - चिखली मतदार संघातील तोरणवाडा(उंद्री), धोत्रा भनगोजी (पेठ) या अंतर्गत असलेल्या 30 गांवाना होणारा विद्युत पुरवठा पुरेशा दाबाने न होणे, परीणामी रोहित्र जळणे, यामुळे गावकुसातील नागरीकां बरोरबच शेतकर्‍यांची होणारी प्रचंड कुचबंना आणी शेती पिकांचे नुकसान पाहता विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी या परीसरातील नागरीकांकडून आग्रही मागणी केल्या जात होती. त्याअनुशंगाने चिखलीचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी या प्रश्‍नाचा पाठपुरावा करत व विविध सासदिय आयुधे वापरीत शासन दरबारी हा प्रश्‍न लावून धरला होता. तर फक्त ग्रामीण भागाकरीता वाहिणी विलगीकरण अखंड (24बाय7) अकृषक ग्राहकांसाठी विद्युत पुरवठा वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे, यासाठी विद्युत वितरण कंपनी राबवित असलेल्या पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती येाजनेत पेठ व उंद्री या विद्युत उपकेंद्राचा प्रयत्नपुर्वक समावेश करून घेतला होता. या दोन्ही विद्युत उपकेंद्राचे येत्या 25 एप्रिल रोजी राज्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विधीवत भ्ाुमीपूजन होणार असल्याने या विद्युत उपकेंद्रासाठी आमदार राहुल बोंद्रे यांनी आजवर केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
महराष्ट्र राज्य विद्युत वितरण कपंनीचे बुलडाणा मंडळा अंतर्गत यावर्षी नव्याने उभारावयाच्या 33/11 केव्ही 29 उपकेंद्रामध्ये आमदार बोंदे्र यांनी प्रयत्नपुर्वक चिखली मतदार संघातील बुलडाणा व चिखली तालुक्यात 10 नविन विद्युत उपकेंद्राचा समावेश प्रयत्न पुर्वक करून घेतला होता. त्यात तोरणवाडा (उंद्री) आणी धोत्रा भनगोजी (पेठ)  या दोन्ही उपकेंद्राचा समावेश असुन वरील दोन्ही उपकेंद्राचे भ्ाुमीपूजन येत्या 25 एप्रिल 2017 रोजी उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होत आहे. वरील दोन्ही विद्युत उपकेंद्र कार्यान्वीत झाल्यानंतर पेठ, उत्रादा, धोत्रा भनगोजी, शेलसुर, सोमठाणा, दिवठाणा, बोरगांव काकडे, तेल्हारा, आन्वी, पांढरदेव, एकलारा, धोडप, आंधई, चांधई, शेलोडी, उंद्री, डासाळा, टाकरखेउ हेलगा, करवंड, हारणी, वैरागड, किन्ही सवडत, मोहदरी, तोरणवाडा, असोला नाईक, धोत्रा नाईक, किन्ही नाईक, मेंडशिंगा, पिंप्री चिंचपुर, श्रीकृष्ण नगर, व वडाळी या 30 गावांना याचा प्रत्यक्ष लाभ पोहचणार आहे. व या गावातील नागरीकांचे विद्युत प्रश्‍न यामुळे निकाली निघणार आहे.
आमदार रहाुल बोंद्रे यांचे सातत्यपुर्ण प्रयत्नामुळे उभारल्या जाणार्‍या तोरणवाडा (उंद्री) 2 कोटी 09 लक्ष रूपये  आणी धोत्रा भनगोजी (पेठ) 2 कोटी 52 लक्ष रूपये किमतीच्या या विद्युत उपकेंद्राची येत्या 25 एप्रिल 2017 रोजी उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भ्ाुमीपूजन होत असून त्या कार्यक्रमास परीसरातील नागरीकांनी मोठया संख्येने हजर राहावे असे आवाहन यावेळी आ.बोंद्रे यांनी केले आहे.