Breaking News

भाजपाला भटक्या विमुक्त संघटनेचा पाठींबा

लातूर, दि. 08 - लातूर महानगर पालिकेची निवडणुक होवू घातलेली असून या निवडणुकीत भाजपाला विजयी करण्यासाठी भटक्या विमुक्त संघटना  सरसावलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेले केंद्र व राज्य सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ साधत  असून जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही हीच भूमिका जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लातूर महानगर पालिकेच्या  निवडणुकीत भाजपाला विजयी करण्यासाठी भटक्या विमुक्त संघटनेनी पालकमंत्री निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत भाजपाला जाहीर पाठींबा दिला आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार समाजातील प्रत्येक  घटकांसाठी विकासाच्या योजना राबवित आहे. या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ साधला जाऊ लागलेला असून लातूर