कृष्णा अभिमत विद्यापीठाचा 4 मे रोजी दीक्षांत सोहळा
कराड, ता. 30 (प्रतिनिधी) : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा 6 वा दीक्षांत सोहळा गुरूवार, दि. 4 मे रोजी दुपारी 3 वाजता विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानचे अध्यक्ष आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर उपस्थित राहणार असून, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या सोहळ्याला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सौ. नीलिमा मलिक आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील 501 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या यंदाच्या 6 व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठात शिकत असलेल्या मेडिकल अधिविभाग (209), नर्सिंग (109), दंतविज्ञान (105), फिजिओथेरपी (48) आणि अलाईड सायन्स अधिविभाग (19) अशा पाच अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी पदवी प्राप्त केलेल्या एकूण 501 विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना विविध 13 पुरस्कारांचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर 11 विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी दिली.