कोरेगाव तालुक्यातील 46 गावे टंचाईग्रस्त
कोरेगाव, दि. 7 (प्रतिनिधी) : कोरेगाव तालुक्यातील 46 गावांमध्ये टंचाई घोषित करण्यात आली असून भावेनगर येथे टँकर सुरु आहे. तसेच संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यास विहिरी अधिग्रहण करण्यासह आवश्यक उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. टँकरच्या संख्येत वाढ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होवू लागली आहे.
कोरेगाव तालुक्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. परिणामी तालुक्यातील उत्तर भागातील बहुतांशी गावांसह दक्षिण डोंगर भागातील गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावधीत तालुक्यातील बहुतांशी गावात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी जलसंधारणाच्या कामांमुळे काही पाणीसाठ्यांचे स्त्रोत मजबूत आहेत. उत्तर भागासह दक्षिण विभागातील दुष्काळसदृश्य गावांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची कमतरता भासत आहे.
तालुक्यातील 46 गावच्या नागरिकांनी पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव गटविकास अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता यांनी तयार करुन महसूल विभागाचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानुसार प्रांताधिकारी खराडेे यांनी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे ते पाठवले असल्याचे सांगितले.
कोलवडी, अरबवाडी, खामकरवाडी, अंबवडे सं. वाघोली, तडवळे सं. वाघोली, चौधरवाडी, शेंदूरजणे, रामोशीवाडी, वेलंग (क.) बोधेवाडी (भा.) भंडारमाची, चिमणगाव, रणदुल्लाबाद, खिरखिंडी, तळीये, रेवडी, भावेनगर, वडाचीवाडी, भाटमवाडी, होळेवाडी या गावांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईसदृश्य स्थितीनुसार वाघोली, चांदवडी, रुई, पिंपरी, शेल्टी, सर्कलवाडी, आसरे, निगडी, आसगाव, अनभुलेवाडी, आसनगाव, विखळे, एकंबे, अपशिंगे, मंगळापूर, देऊन, अंबवडे सं. कोरेगाव, पिंपोडे खुर्द, दुधनवाडी, खडखडवाडी, बनवडी, राऊतवाडी, ल्हासुर्णे, पिंपोडे बु।, भिवडी अशा 46 गावांमध्ये टंचाई घोषित करण्यात आली असल्याचे तहसीलदार हेमंत निकम, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनी सांगितले.