आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांची बीज भांडवल योजना खुल्या प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी राबविली जाते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकात केंद्राचे सहाय्यक संचालक सुनील पवार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजकतेला वाव देण्यासाठी व जास्तीत-जास्त उमेदवारांनी रोजगाराच्या मागे न लागता स्वयंरोजगार सुरु करुन इतरांना रोजगार मिळवून द्यावा. यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेत महामंडळाकडून 35 टक्के रक्कम 4 टक्के दराने देण्यात येते. 5 टक्के रक्कम उमेदवाराचा सहभाग व 60 टक्के रक्कम बँकेकडून बँकेच्या व्याज दराप्रमाणे देण्यात येते. कर्ज फेडीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. त्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. त्याचे वय किमान 18 व कमाल 45 वर्षे यादरम्यान असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 6 लाख असावी. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही बँकेची/वित्तीय संस्थेची थकबाकीदार नसावी. कर्ज देण्याची प्रक्रिया ऑनलाई असून अधिक माहितीसाठी ुुु.ारहरीु रूराीेक्षसरी.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळाला किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला एसटी स्टॅण्ड जवळ, सातारा येथे संपर्क साधावा.