महावितरणच्या 394 कर्मचार्यांना कामगार दिनानिमित्त ’खास भेट’
जळगाव, दि. 21 - मनुष्यबळ ही व्यवस्थापनाची संपत्तीनुभवी मनुष्यबळाला पदोन्नती व उच्च वेतनश्रेणीचे प्रोत्साहनपर लाभ ही देणो ही व्यवस्थापनाच्या विकासाच्या दृष्टीने हिताचे असते. तसेच कर्मचार्यांना हे लाभ आर्थिक व मानसिक दृष्ट्या दीर्घकालीन फायदेशीर ठरतात. त्यामुळे कर्मचारीवर्गाचे मनोबल उंचाविण्यास व कार्यक्षमता वाढीस मदत होते. याच दुहेरी हेतूने महावितरण प्रशासनाने जळगाव परिमंडळात कार्यरत तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील 394 कर्मचार्यांना कामगार दिनाची अँडव्हान्स गिफ्ट दिली आहे. त्यात 144 कर्मचार्यांना पदोन्नती तर 250 कर्मचार्यांना उच्च वेतनश्रेणीचा लाभ दिला आहे.
महावितरणच्या ग्राहकांना तत्पर व दज्रेदार सेवा देण्यासाठी तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेतात. वीजबील वसुली, वीजचोराविरूध्द कारवाई, विद्युत यंत्रणोची देखभाल व दुरूस्ती , बिलिंग आदी सर्व कामे पुर्णत्वास नेण्यात सातत्याने अग्रेसर असतात. जळगांव मंडळस्तरावर गठित समितीने तांत्रिक संवर्गातील वर्ग-3 मधील 113 कर्मचार्यांना तंत्रज्ञ ते वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर पदोन्नती व उच्च वेतन श्रेणीसाठी पात्र कर्मचारी वर्गास देय लाभ देण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र म्हकांळे व वरिष्ठ व्यवस्थापक रामचंद्र वैदकर यांनी व्यवस्थापक तात्या अहीरे (नंदुरबार), सुभाष पवार (धुळे) उध्दव कडवे (जळगाव) यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व संबंधित कर्मचारी वर्गाचे आभार मानले आहेत.