ग्रामीण डाकसेवक संघटनेचा 25 एप्रिलपासून बेमुदत संप
जळगाव, दि. 21 - शहरातील डिव्हीजन ऑफीस समोर आपल्या विविधांसाठी ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटनेने दि. 29 मार्च रोजी धरणे आंदोलन करुनही मागण्या पुर्ण न झाल्याने दि.25 एप्रिल पासून ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. संघटनेच्या मागण्या जीडीएस कमिटीच्या अहवालाची त्वरीत अंमलबजावणी करा, जीडीएस कर्मचार्यांना केंद्रीय कर्मचार्यांचा दर्जा देयात यावे, शाखा डाक घरांना कमीत कमी 5 तास व 5 तासाच्या वर कर्याअवधी निर्धारित करण्यात यावा, जीडीएस ला जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतन निर्धारित करण्यात यावे, जीडीएसला आरोग्य सुविधा लागू करण्यात यावी, शाखा डाक घरांची एबीसीडी असे वर्गीकरण करण्यात येऊ नये, जीडीएसला संयुक्त कार्याचा शिफारशी लागू करु नये अशा विविध मागण्या आहेत. तरी या बेमुदत संपात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव व सचिव ज्ञानेश्वर पाटील पारोळा यांनी पत्रकाद्वारे केले आहे.