विदर्भात 24 तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता
मुंबर्ई, दि. 22 - राज्यात सूर्य नारायण आग ओकतच आहे. त्यामुळे उन्हाची काहिली काही केल्या कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातच विदर्भात पुढल्या 24 तासांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कहर कायम आहे. या उष्णतेच्या लाटेमध्ये विशेष काळजी आपण घेतली पाहिजे.