अनिस बेगचा दे.घाट येथे भव्य नागरी सत्कार
बुलडाणा, दि. 12 - नुकत्याच भारतीय अंध क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकीस्तान संघाला पराजित करून विश्वचषक जिंंकला. या भारतीय संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील अनीस फखरूल्लाह बेगचा समावेश आहे. विश्वस्तरीय क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक करणारा हा अंध खेळाडू अनीस बेग 8 मार्चला आपल्या मुळ गावी देऊळघाटला आला, तेव्हा त्याचा गावात भव्य नागरी सत्कार करुन गावातुुन जंगी मिरवणुक काढण्यात आली.
जन्मापासून अंध असलेल्या अनीसला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. घरची परिस्थिती हलाखीची व आई वडीलांचे शिक्षण कमी असल्यामुळे त्याला प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन घरून मिळाले नाही. आपली जिद्द व मेहनतीच्या जोरावरच अनीसने झेप घेवून भारतीय अंध क्रिकेट संघात स्थान मिळविले व भारताला विश्वचषक जिंकून देण्यासाठी मोलाची भ्ाुमिका बजावली. या मोठ्या यशानंतर 8 मार्चला अनीस आपल्या मुळ गावी देऊळघाटला पोहोचला तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. एका खुल्या जिपवर तिरंगा झेंडा लावुन त्याची पुर्ण गावात आतीषबाजी, ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच ग्राम पंचायतमध्ये गावाच्या वतीने सरपंच आरिफ खान यांनी अनीसचा नागरी सत्कार केला. यावेळी उपस्थित बुलडाणा उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी, बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार अशोक कंकाळे यांनीसुध्दा अनीसचा सत्कार केला.
कार्यक्रमात माजी पं.स.उपसभापती मुश्ताक अहेमद, माजी सरपंच बिस्मिल्लाह खाँ, युनुस खान, ग्रा.पं. सदस्य हाजी इद्रीस बागवान, पत्रकार कासिम शेख, विकास देशमुख, सखाराम पाटील, प्रशांत देशमुख, अॅड.शहेजाद शिरानी, गजनफर खान, ग्रामविकास अधिकारी संजय बाजड, तलाठी विजय सावळे, बीट जमादार सातव, शे.इसराईल, साबीर खान, शे.रहेमान, सईद खान, शे.अमान, शे.वसीम, शे.इद्रीस, सुफियान खान, कदीर खान, शे.अकरम, सै.जुनेद व ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन इमरान खान तर आाार अकील खान यांनी मानले.