Breaking News

होळी निमित्त बहुजन साहित्य संघाचे हास्य कविसंमेलन

बुलडाणा, दि. 12 - होळी म्हटली की सोबत ‘रंगपंचमी’ आलीच! त्यानिमित्त आपल्या दिलखुलास प्रतिभेचे हुरहुन्नरी रंग काव्य रूपाने उधळण्यासाठी बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने हास्य कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून सर्व रसिकांना, कविंना तथा नागरिकांना त्यात सहभागी होवून आनंद सोहळा साजरा करण्यासाठी जाहीर व नम्रतेचेआवाहन बहुजन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, बहुजन साहित्य संघ, चिखली गेल्या काही महिन्यांपासून साहित्यक्षेत्रातील नवोदित तसेच तरूण कवी, लेखक, साहित्यिकांकरिता एक मंच उभे करून देत आहे. बहुजन साहित्य संघाच्या वतीने अशा कवीं, लेखकांना प्रोत्साहन देण्यात येत असून साहित्यक्षेत्रामध्ये त्यांना भरीव कामगिरी करता यावी याकरितासुद्धा मार्गदर्शन करीत आहे. त्याचाच परिपाक म्हणजे चिखली शहरासह जिल्ह्यामध्ये बहुजन साहित्य संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. खास होळीनिमित्त चिखली शहरात ‘हास्य कविसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व नवोदित कवींसह प्रस्थापित कवी, साहित्यिक, लेखक यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण असून त्यांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन बहुजन संघाचे साहित्य सचिव मनोहर पवार, अध्यक्ष अ‍ॅड.विजयकुमार कस्तुरे, महेश वाधवाणी, किसन पिसे उपाध्यक्ष, सुधीर लंके, अ‍ॅड.गिरीष दुबे, सौ.कविता लंके, एजाज खान, सौ.ज्योती भवर, कु. भाग्यश्री यंकळकर, कु.कुमुद पवार, सौ.शशिकला भराड, सदाशिव फुलझाडे, सौ.कुंदाताई महाजन, सौ.किशोरीताई व्यवहारे, सौ.पिटकर मॅडम, कवि नंदी, सौ.काटोले मॅडम, सौ.पावडे मॅडम, अ‍ॅड.आर.डी.पवार, अ‍ॅड.राधिका गणोजेकर, संजय वाकोडे, सुनिल कासारे, अनिल कांबळे, अनिल चव्हाण, अ‍ॅड.सलीम शेख, डॉ.गोविंद गायकी, नज़ीम खान, राजेंद्र व्यास, अ‍ॅड.शाकीर शेख आदींनी केले आहे.