समाजसेवक रामदास देव्हडे यांना राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर
बुलडाणा, दि. 24 - चिखली येथील प्रतिष्ठीत नागरीक तथा समाजसेवक , माजी नगरसेवक रामदास भाऊ देव्हडे यांना नुकताच पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2017 जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार हा डॉ. मनिभाई देसाई प्रतिष्ठान व नेहरु युवा केंद्र क्रिडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर करण्यात येतो.
श्री. रामदास भाऊ देव्हडे यांनी आपल्या कृतार्थ जीवनाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत तसेच त्यांनी केलेल्या समाजकार्याची तसेच सामाजीक क्षेत्रात सामाजीक सामीलकी स सामाजीक बांधीलकीची जाण व भान ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य ते अत्यंत निरलसपणे करीत असल्याने हे कार्य समाजाला भूषणावह व आदर्श असल्याने या कार्याची व त्यांच्या कर्तृत्वची दखल घेवून उपरोक्त प्रतिष्ठानतर्फे दि.21/3/2017 रोजी पत्र पाठवून श्री. रामदास भाऊ देव्हडे यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे आपल्या पत्राद्वारे कळविले आहे.
सदर पुरस्कार त्यांना दि. 27 एप्रील 2017 रोजी आण्णाभाऊ साठे स्मारक पद्मावती , पुणे येथे त्यांना प्रदान करण्यात येणार असुन ही गोष्ट चिखलीवासीयांसाठी नक्कीच अभिमानाची आहे. या पुरस्कार निवडीने श्री. रामदासभाऊ देव्हडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असुन शहारातील अनेक मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्षभेट घेवून सदर पुरस्काराबद्दल अभीनंदन केले आहे. त्यात प्रामुख्याने चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी. तालुकाध्यक्ष संजय माणीकराव गाडेकर यांनी रामदासभाऊ देव्हडे यांना पुष्पगुच्छ देवून अभीनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच चिखली येथील न.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. काशपाक सर, शेख आबीद शे. अफसर, एस.एन. जाधव, श्री. ढंगारी श्री. ग.ना. शेटे , श्री. दांडगे , श्री. एस.एन. जाधव यांनी श्री. देव्हडे यांचे निवासस्थानी भेट घेवून त्यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.