जळगाव मतदार संघातील रस्ते विकासासाठी 123 कोटींची तरतूद
बुलडाणा, दि. 24 - राज्याच्या अर्थसंकल्पात जळगाव जामोद मतदार संघातील रस्ते विकासासाठी तब्बल 123 कोटी रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मतदार संघातील रस्ते सुरळीत व्हावे, याकरीता या विभागाचे आमदार संजय कुटे सातत्याने पाठपुरावा करीत असून एवड्या मोठया प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूदीने त्यांच्या मागणीला मोठे यश प्राप्त झाले आहे.
यामध्ये अन्युॅटी रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याला जोडणारा खांडवी-भेंडवळ-पातुर्डा-उकळी ते जिल्हा सिमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग 278 या रस्त्याची सुधारणा करणे लांबी 33 किमी अंदाजे किंमत 110 कोटी, रा.मा. 47 वरील लाडणापूर ते जिल्हा सिमेपर्यंत सुधारणेसह दोन वर्षे करीता देखभाल दुरूस्ती करणे किंमत 3 कोटी 14 लक्ष रुपये, लांबी 10 किमी, रा.मा. 47 वर करणवाडी ते खांडवी सुधारणेसह दोन वर्षे देखभाल दुरूस्ती करणे लांबी 10 किमी किंमत 3 कोटी, रा.मा. 47 वर जळगाव ते जामोद रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 30 लक्ष लांबी 12 किमी, तसेच आसलगाव टाकळी खाली पारब, परशरामपूर वडशिंगी मध्ये 4/00 ते 10/800 आणि अंबाबर्वा, वसाडी, टुनकी प्रनिमा 1 वरील 12/750 ते 17/750 मधील लांबीची सुधारणासाठी 3 कोटी अंतर झाले आहे. या कामामुळे मतदार संघातील रस्ते मोठया प्रमाणात विकसीत होणार असल्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.