Breaking News

युवा गौरव पुरस्कारांचे सातार्‍यात वितरण

सातारा, दि. 24 (जिमाका) : नेहरु युवा केंद्रांच्यावतीने युवा गौरव पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ व  क्रीडा साहित्य वितरण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झाला.
कार्यक्रमाची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्य संचालक उपेंद्र ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, क्रीडा अधिकारी सुहास पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, अ‍ॅङ संभाजी मोहिते, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कच्या प्राचार्य शाले जोसेफ, माविमच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक भानुदास यादव उपस्थित होते.
अ‍ॅड. संभाजी मोहिते अध्यक्ष नेहरु युवा मंडळ शिरगाव, ता. कराड (जिल्ह्यामध्ये पहिली युवा मंडळाच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सुरु केली आहे.), निलेश धनावडे अध्यक्ष नेहरु युवा मंडळ करंजे, ता. जावली, दत्तात्रय यादव अध्यक्ष नेहरु युवा मंडळ सोमंथळी, ता. फलटण, संतोष पवार अध्यक्ष नेहरु युवा मंडळ धावडशी, ता. सातारा, नवनाथ जगताप अध्यक्ष नेहरु युवा मंडळ धोंडेवाडी, ता. खटाव, संदिप तानाजी पांगारे सचिव नेहरु युवा मंडळ पांगारे, ता. महाबळेश्‍वर, आनंदा बाबुराव थोरात सदस्य नेहरु युवा मंडळ ओंड, ता. कराड, सिध्दनाथ शिंदे उत्कृष्ट मार्गदर्शक International Folk Dance नेहरु युवा केंद्र सातारा, विशाल शिंदे सचिव नेहरु युवा मंडळ पिंपरे बु., ता. खंडाळा, रामदास धुरगुडे सचिव नेहरु युवा मंडळ भिरडाचीवाडी, ता. वाई, विक्रम बर्गे सदस्य नेहरु युवा मंडळ कोरेगाव, महेश सोनावणे (खपींशीपरींळेपरश्र ऋेश्रज्ञ ऊरपलश 2016-17 मध्ये सलग पहिला नंबर राष्ट्रीय शिक्षा अभियान स्टेट लेवल प्रथम क्रमांक दिग्दर्शन) यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करुन गौरविण्यात आले.