अध्यक्ष पदाचा लाल दिवा कोणाच्या निशिबात? आज फैसला
सातारा, दि. 20 (रघुनाथ कुंभार) : सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांचा कार्यकाल संपत आला असल्याने नूतन सदस्यांपैकी कोण अध्यक्ष, कोण उपाध्यक्ष तर कोण सभापती होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईकनिंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे, ही चर्चा खरी ठरणार की नुसतीच चर्चा होणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
गत सहा महिन्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांसह सदस्यांना विद्यमान कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव प्रकरणामुळे चांगलीच नाचक्की झाली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुलाखती घेण्याचा मार्ग अवलंबून आपला नाही तर तो कोणाचाही होणार नाही, अशी स्थिती संभाव्य उमेदवारांची बनविली होती. तर शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या सुचना पक्षाच्या वरिष्ठांनी दिल्याने बंडखोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. खा. उदयनराजे भोसले, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, यांच्या विचाराच्या लोकांनी आपापल्या पध्दतीने उमेदवार जाहीर करून प्रचार सुरु केला होता. तर विद्यमान सदस्य अनिल देसाई यांना राष्ट्रवादी डावलेल अशी शक्यता वाटल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपाशी जवळीक केली. दरम्यान, देसाई स्वत: उमेदवारीपासून दूर राहून भावजयी विरुध्द त्यांची आई असा सामना घडवून आणला. त्यात भावजयी सौ. देसाई यांच्याकडून त्यांच्या आई श्रीमती जगदाळे (राष्ट्रवादी) यांचा पराभव केला.
जिल्ह्यात काँग्रेसचे 3 आमदार, शिवसेनेचा 1 तर उर्वरित 9 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. अशा स्थितीत ज्याचा-त्यांनी विधानसभा मतदार संघ सांभाळण्याची जबाबदारी असल्याने प्रचाराच्या तोफा चांगल्याच डागल्या जात होत्या. काही तालुक्यात माण आणि जावळी तालुक्यात भाजपला घुसखोरी करता आली, तर राष्ट्रवादीने 39 जागा निवडूण आणल्यामुळे काँग्रेससमोर मदतीचा किंवा आघाडीसाठी हात पसरण्याची वेळ आली नाही. याउलट राष्ट्रवादीने शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांचे अर्ज भरल्याने तोलामोलाचे उमेदवार निवडूण आणण्यात राष्ट्रवादीला यश आले.
21 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर काम करण्यासाठी नविन सदस्यांसाठी निवडणूक झाली. मात्र, पदाधिकार्यांच्या निवडी आता पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पद पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेकांनी आपल्या नेत्यांवर विविध प्रकारे दबाव तंत्राचा वापर करण्यास सुुरुवात केली आहे. त्यामध्ये आपण कसे पदाला साजेसे आहोत हे पटवून देण्याचे काम सदस्य करत आहेत.
तर नेत्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यंदाचा अध्यक्ष खुला प्रवर्गातून निवड करावी लागणार असल्याने खुला प्रवर्गातील सदस्यांनी चांगलाच जोर लावला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे, जयवंतराव भोसले, राजेश पवार यांची नावे चर्चेत आहेत. चर्चेत असणारी नावे चर्चेतच राहणार की, त्यांच्या निवडी होणार याबाबत सोमवार, दि. 20 रोजी होणार्या बैठकित निश्चित होईल.