Breaking News

विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेतला पाहिजे - ॠषी जाधव

बुलडाणा, दि. 20 - मनातील इच्छा पुर्ण करण्यासाठी व उज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या अभ्यास करूण अर्थात अभ्यासिक करून अर्थात अभ्यासिका चा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हाप्रमुख ॠषी जाधव यांनी व्यक्त केले. निमित्य होते ते भगीरथ बहुउद्देशीय संस्था अंजनी बु. मार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ज्ञानज्योती अभ्यासिका च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जयचंद बाठीया मेहकर न.पा.चे उपाध्यक्ष यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष ॠषी जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणुन नुकतेच नर्वाचित जि.प.सद्य तथा जि.प.बुलडाणा चे शिवसेना गटनेते आशिष रहाटे, जि.प सद्य राजेंद्र पळसकर, माजी सभापती सुरेश आढाव, प.स.सद्य निंबा पांडव, समाधान साबळे, नगरसेवक रामेश्‍वर भिसे, नगरसेवक ओम सौभागे, तौफिक कुरेशी, डोंगरदिवे सर, पत्रकार रफीक कुरेशी, देशमुख सर, अरूण पोपळघट, पत्रकार लक्ष्मण शिवणकर, प्रमोद काळे यांची उपस्थिती होती.