सातार्यात रंगोत्सव 2017 चे जोरदार आयोजन
सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) : कर्तव्य महिला सोशल ग्रुपच्या रंगोत्सव 2017 निमित्त सातार्यात गीत-संगिताच्या तालावर मंत्रमुग्ध होवून हजारो महिला एकी, आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या अनोख्या रंगात ओल्याचिंब होवून गेल्या. लाल, हिरवा, निळा, केशरी, तांबडा, पांढरा अशा अनेक रंगांनी लहान-लहान मुलींपासून ते वृध्द महिलांपर्यंत सर्वांनीच एकमेकींना स्नेहाच्या रंगात भिजवून रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. हजारो महिलांनी पारंपारिक रंगपंचमी सण उत्साहाने साजरा केला.
सण, उत्सवांची परंपरा जपण्यासाठी, बिभत्सपणाला बाजूला ठेवून महिलांना आपली संस्कृती जतन करत रंगपंचमी साजरी करता यावी, यासाठी कर्तव्य महिला सोशल ग्रुपतर्फे फक्त महिलांसाठी शुक्रवारी कोटेश्वर मैदानासमोरील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानात रंगोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते. रंगोत्सवाला हजारो महिलांनी गर्दी केल्याने या कार्यक्रमाची जोरदार चर्चा झाली. सायंकाळी 5 वाजता कर्तव्य ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत रंगोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. समिंद्रा जाधव, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, नगरसेविका सौ. दिपलक्ष्मी नाईक, सौ. लिना गोरे, सौ. मनिषा काळोखे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. कविता चव्हाण, माजी नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुनी, माजी नगरसेविका सौ. हेमा तपासे, सौ. वैशाली राऊत, प्रभावती मोरे, सेवादलाच्या संघटक सिता जाधव यांच्यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक, व्यवसाय, शैक्षणिक, सामाजिक आदी सर्वच क्षैत्रातील महिलांसह गृहीणी हजारोंच्या संख्येने रंगोत्सवात सहभागी झाल्या होत्या.
दुपारी चारपासूनच शहराच्या विविध भागातून महिलांचे जथ्थेच्या जथ्थे कला वाणिज्य महाविद्यालयाकडे जाताना दिसत होते. संगिताच्या तालासुरांमुळे रंगोत्सवात बहर आला. हळुहळू मैदान खचाखच भरुन गेले. महिलांची उपस्थिती वाढल्याने आणि सुरक्षिततेच्यादृष्टीने महिला पोलीस कर्मचारीही मैदानाबाहेर उपस्थित झाले होते. पाचच्या सुमारास कर्तव्य सोशल ग्रुपने उपलब्ध करुन दिलेल्या नैसर्गिक रंगांची उधळण सुरु झाली आणि रंगोत्सवाला अभुतपुर्व उत्साहात प्रारंभ झाला. आयोजकांनी मैदानावर हवेत पाण्याचे फवारे सोडल्याने रंगोत्सवाची रंगत आणखीन वाढली आणि उत्सवात सहभागी महिलांनी तालासुरांवर ठेका धरला. रंगोत्सवात रेन डान्स सुरु झाल्याने सहभागी लहान मुलींपासून ते वृध्दांपर्यंत सर्वच महिलांनी रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. विविध रंगांच्या उधळणीमुळे मैदानावर रंगीबेरंगी, उत्साही दुनिया अवतरल्याचा आभास होत होता. सायंकाळी सहानंतर गर्दी आणखीनच वाढली. यामुळे रात्री 8.30 पर्यंत रंगोत्सव सुरु होता. अनेक महिलांनी या ऐतिहासिक रंगतदार क्षणांना मोबाईलमध्ये कॅमेराबंद केले तर, अनेक युवतींनी सेल्फी आणि व्हीडीओ काढून ते फेसबुक, व्हॉटस अपवर अपलोड करुन रंगोत्सवाचा आनंद द्विगुणीत केला.