नाफेड मार्फत विनाविलंब तुर खरेदी सुरू करा
अन्यथा रास्ता रोखो करण्याचा शिवसंग्राम संघटनेचा ईशारा
बुलडाणा, दि. 20 - देऊळगांव राजा तालुक्यातील शेतकर्यांची तुर नाफेड मार्फत खरेदी करणे सुरु आहे.परंतु नाफेड च्या नियोजन शून्य कारभरामुळे शेतकर्यांची तुर घेण्यास विलंब होत आहे.त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक भूर्तण्ड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.अशी तक्रार शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी आज सहाय्यक निबंधक श्री राठोड यांच्याकडे एका निवेदना द्वारे केले.या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे तुरीचे पिक चांगले आले आहे.बाजार समिति मध्ये तुरीला कमी भाव असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी नाफेड बरा भाव असल्या कारणाने तूर विक्री करत आहे.परंतु खरेदी विक्री संघ व नाफेड यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे शेतकर्यांची तुर खरेदी करण्यास विलंब होत आहे.अनेक शेतकरी 10 ते 15 दिवसा पासून वखार महामंडळा च्या गोडाउन वर तुरीने भरलेले वाहने घेऊन थाबले आहे.यामुळे शेतकर्यांचा राहण्याच्या,खाण्याचा खर्च विनाकरण वाढत आहे.तसेच गाडी भाड़े खर्च जास्त दिवस गाड़ी खाली न झाल्यामुळे वाढत आहे. खरेदी विक्री संचालक मंडळ या कडे हेतु पुरस्कृत दूरलक्ष्य करतांनी दिसत आहे त्यामुळे शेतकर्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .याउलट कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच काही व्यापारी व विशिष्ट लोकांची तुर तात्काळ विलंब न करता खरेदी केल्या जात आहे.असा आरोप शिवसंग्राम संघटनेने नाफेड चे कर्मचारी व खरेदी विक्री संघाचे संचालक तसेच कर्मचारी यांच्यावर केला आहे.
तुर उत्पादक शेतकर्यावर होणार अन्याय तात्काळ बंद करुन कुठलाही भेद -भाव न करता सर्व सामान्य शेतकर्यांची तुर विलंब न करता खरेदी करा,शेतकर्यांची होणारी पुळवणुक थांबवा अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तुर उत्पादक शेतकर्यांना सोबत घेऊन वखार महामंडळ सिंनगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोखो करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारा देण्यात आला.निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,तालुका संघटक जाहिर खान पठाण यांच्या स्वाक्षर्या असून या वेळी बालाजी खांडेभराड,परमेस्वर जाधव,अजीज पठाण,चंद्रभान झीने,शिवाजी सुरुसे,विनायक अनपट, ज्ञानेस्वर ननवरे यासह तुर उत्पादक शेतकरी हजर होते.
