स्त्रीने समाजाला आपल्या क्षमतेची जाणीव करून द्यावी : डॉ. प्रज्ञा कासार
लातूर (प्रतिनिधी), दि. 16 - स्त्री - पुरुष समानतेची व्याख्या करतांना अनेक बाबतीत महिलांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. परंतु महिलांनी याची खंत न बाळगता समाजाला आपल्या क्षमतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायला हवा , असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री रिलीफ फंडाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळणार्या डॉ. प्रज्ञा कासार यांनी केले.
आयएमए आयडीए , निमा आदी वैद्यकीय संघटनांच्या महिला शाखांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. कासार बोलत होत्या. यावेळी सौ. सुनीता राठोड, आयएमए चे अध्यक्ष डॉ. दीपक गुगळे, आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. शैला सोमाणी , सचिव डॉ. आरती झंवर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. प्रज्ञा कासार यांनी अत्यंत परखडपणे आपले विचार व्यक्त केले. समाजात वावरताना महिलांना आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना स्वतःचे निर्णय स्वतः घेताना खूप अवघडल्यासारखे होते. प्रशासकीय कामकाजातील महिलांचा सहभाग अनेकांना वेगळा वाटतो. त्यामुळे त्यांच्यावर अधिक महत्वाची जबाबदारी दिली जात नाही. मात्र आजच्या महिलांनी त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तत्पर असल्याचे वेळोवेळी दाखवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.असे आवाहन केले.
डॉ. दीपक गुगळे यांनी यावेळी बोलताना जागतिक महिला दिनाचे महत्व विशद करून स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला आपण मानाचा सलाम करतो असे सांगितले. या कार्यक्रमात अनेक महिला डॉक्टर्सनी आपल्या कलाविष्काराचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मंजुषा कुलकर्णी , डॉ. श्वेता काटकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आरती झंवर यांनी केले.