लातूरच्या स्वरसम्राज्ञीकडून संत जनाबाईंच्या अंभगांचा जागर
लातूर (प्रतिनिधी), दि. 16 - संगीत क्षेत्रात अभंगांना फार मोठे महत्व आहे. अभंगांची रचना करणार्या अनेक संतांची नावे आजही संगीत क्षेत्रात अजरामर असून संत जनाबाईंनी रचलेले अभंग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरलेले आहेत. लातूरच्या स्वरसम्राज्ञी आसावरी जोशी बोधनकर यांनी या अभंगांचा वारसा आपल्या गायनातून पुढे चालू ठेवलेला आहे. यापूर्वी केवळ आशा भोसले यांनीच संत जनाबाई यांच्या अभंगाचे गायन केलेले असून त्यानंतर आसावरी जोशी यांच्याकडून या अभंगांचे गायन होत आहे.
माझी आई विठाई हा अभंग रचणार्या संत जनाबाई श्रेष्ठ अभंग गायिका सुध्दा होत्या. अभंगांचे गायन म्हणजे एक वेगळीच कला आहे. अभंगांच्या गायनाची परंपरा महाराष्ट्रात अनेक गायकांनी जोपासलेली आहे. यापूर्वी संत जनाबाईंच्या अभंगांचे गायन केवळ प्रसिध्द गायिका आशा भोसले यांच्याकडून करण्यात आलेले होते. मात्र यानंतर संत जनाबाईंच्या अभंगाचे गायन संगीताच्या पडद्याआड झालेले होते. संत जनाबाईंच्या अभंगांना पुन्हा एकदा व्यासपीठ मिळवून देण्याचे काम लातूरच्या स्वरसम्राज्ञी आसावरी जोशी बोधनकर यांनी केलेले आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध संगीत स्पर्धांमध्ये प्रथम बक्षीसाच्या मानकरी ठरलेल्या आहेत. तसेच सोनी टेलिव्हिजनच्या इंडियन आयडॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्या पोहोचलेल्या होत्या. आता त्यांच्याकडून संत जनाबाईंच्या अभंगांचा जागर करण्यात येणार असून त्याचा पहिला कार्यक्रम लातूरमध्येच आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रम दयानंद सभागृहात गुरूवारी दि. 16 मार्च रोजी होणार असून आसावरी जोशी बोधनकर यांच्या गायनाला संगीताची साथ देण्यासाठी मुंबई येथील विनय चेऊलकर व त्यांचे साथीदार असणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ताथोडे ज्वेलर्स, प्रमोद गॅस एजन्सी, अतुल ठोंबरे अॅन्ड असोसिएटस्, साईबाबा ग्रीन पॉवर, प्रगती कन्स्ट्रक्शन, गायत्री भोज, मेरीडीयन अॅक्वा व जे.के. असोसिएटस् यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. या अभंग जागर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संगीतप्रेमी नागरिकांसह लातूरकरांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.