Breaking News

निमगाव वाघा येथे डोंगरे संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहिम

अहमदनगर, दि. 18 - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, विद्यालयाचे प्र.मुख्यध्यापक प्रा.किसन वाबळे, कवी बाळासाहेब अमृते, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, सौ.शुभांगी धामणे, तुकाराम खळदकर आदि उपस्थित होते.
प्रारंभी गावातील नवनाथ विद्यालयाच्या आवारापासून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. परिसरातील केर कचरा साफ करुन, वाढलेले काटेरी गवत व झाडे झुडपे हटविण्यात आले. स्वच्छता मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक व संस्थेचे सदस्य सहभागी झाले होते.
पै.नाना डोंगरे यांनी निरोगी आरोग्यासाठी गावाची स्वच्छता आवश्यक असल्याचे सांगून, स्वच्छता अभियानामुळे गावाचे वातावरण आरोग्यदायी राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. कवी बाळासाहेब अमृते यांनी गावातील स्वच्छते संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.