पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य बार्नबस यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार
अहमदनगर, दि. 18 - येथील अहमदनगर महाविद्यालयास अनुदान आयोग नवी दिल्लीचा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, क्षमतेचे महाविद्यालय पुरस्कार तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. जे. बार्नबस यांना क्वाललंपूर (मलेशिया) येथील इनोव्हेटिव्ह अॅकॅडमिक रिसर्च अॅण्ड डेडिकेटेड प्रिन्सिपल हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बार्नबस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, प्रा.डॉ.नंदकुमार सोमवंशी, वैभव ढाकणे, प्रतिक शिंगवी, मयूर दुसुंगे, अक्षय घोरपडे, अन्सार सय्यद, सुरज दळवी, निलेश पंडित, किरण आवारे, अक्षय पडवळे, दिपक आढाव, रवी भुतकर, रोहित शिंदे, गोपाळ सारडा, निखील दळवी, रितेश सैगर, पवन जंगम, वैभव ढाकणे, प्रेम कुमार, अहमद काझी, युनुस शेख, अशोक सम्राट आदिंसह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.आर.जे. बार्नबस यांनी मिळालेल्या पुरस्काराने महाविद्यालयाच्या यशात आनखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सांगितले. मला व महाविद्यालयास मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा.माणिक विधाते म्हणाले की, अहमदनगर महाविद्यालयास मोठी परंपरा आहे. या महाविद्यालयातून अनेक कला, साहित्य, उद्योग, राजकिय, क्रीडा व विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती घडले आहे. महाविद्यालयाला मिळालेल्या पुरस्काराने शहराच्या नांवलौकिकात भर पडली आहे. महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य यांचा देखील मेलेशियात सन्माण होणे ही भुषणावह बाब असल्याची त्यांनी सांगितले.
