Breaking News

महिलांना अर्थकारण समजणे हे विकासात्मक दृष्टीचे लक्षण - कळमकर

अहमदनगर, दि. 23 - महिलांना अर्थकारण समजणे हे विकासात्मक दृष्टीचे लक्षण आहे. महिला बचतगटाच्या माध्यमातून आज आर्थिक सक्षम होताना दिसत आहे. चुल व मूल सांभळत महिलांनी घराबाहेर पडून बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योग थाटले आहे. यासाठी महिलांना कुटुंबीय व समाजाचे पाठबळ मिळाल्यास अर्थक्रांती होणार असल्याचा विश्‍वास माजी माहापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केला.  
बिशप लॉईड कॉलनी, सिव्हिल हडको येथील आशिष वुमेन्स मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता निर्माण करणार्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी कळमकर बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका कलावती शेळके, सामाजिक कार्यकर्त्या कमलताई गिरी, मायाताई जाधव उपस्थित होत्या.
 पुढे कळमकर म्हणाले की, पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना त्यांची गुणवत्ता सिध्द करण्याचा हक्क मिळाला पाहिजे. सर्व महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देवून, त्यांना मार्गदर्शन करणार्या मायाताई जाधव यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वार्ड अध्यक्ष म्हणून जाधव यांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट केले.
आर्थिक सक्षमता निर्माण करणार्‍यां महिला बचत गटाच्या प्रतिभा त्रिभुवन, पुष्पा जाधव, संगीता कदम, उषा म्हंकाळे, कल्पना जाधव,  सुजाता आल्हाट, आशा  सोनवणे, सुलभा सगळगिळे,  सरोज घोडके, संगीता क्षेत्रे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.