Breaking News

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल माजी विद्यार्थी संघ आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न

अहमदनगर, दि. 23 - भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या चित्रकला, काव्यवाचन, हस्ताक्षर व निबंध या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगर शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक कानडे व नगर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, सायन्स हॉल येथे संपन्न झाला.
याप्रसंगी चिटणीस मिलिंद गंधे, अध्यक्ष विलास देवी, कार्याध्यक्ष पद्माकर देशपांडे, मंगलाताई कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात विलास देवी म्हणाले की, खूप वर्षापासून हा विद्यार्थी संघ स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करतो. या स्पर्धेत नगर शहरातील व अ.नगर जिल्ह्यातील शाळा यात सहभागी होतात.
अशोक कानडे म्हणाले की, फिरोदिया हायस्कूलमध्ये पूर्वीपासून शिस्त फार कडक आहे. या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे, याचा मला अभिमान आहे.
शैलेश मुनोत म्हणाले की, मी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या 1987च्या बॅचचा विद्यार्थी आहे. स्व. सुरेशजी मुनोत यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणार्‍या स्पर्धेसाठी मी प्रायोजकत्व  देण्याचे आश्‍वासन देतो.  पारितोषिक यादीचे वाचन किरण कुलथे यांनी केले. आभार प्रदर्शन पद्माकर देशपांडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश दायमा, सचिन डागा, गोविंदराव मुळे, उज्ज्वला मुदकवी, अंजली गुंदेचा, दिनकर देशमुख, संतोष गांधी यांनी विशेष प्रयत्न केले.