Breaking News

करवंडला होणार जिल्हा मराठी साहित्य संमेलन

उद्घाटक श्रीपाद भालचंद्र जोशी तर संमेलनाध्यक्ष डॉ.गणेश गायकवाड
बुलडाणा, दि. 22 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संदर्भ जुळणारे गाव म्हणून बावन बुरजी (52 बुरजांचे गाव) अर्थात करवंड गावी 10वे जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूर आणि विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणाच्या वतीने चिखली तालुक्यातील करवंड येथील राजमाता जिजाऊ साहित्य नगरी स्व.माधवराव देशमुख माध्यमिक आश्रमशाळेत रविवार 26 मार्च रोजी एक दिवशीय संमेलन होणार आहे.
सहा सत्रामध्ये पार पडणाछया संमेलनादरम्यान रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी राहणार आहे. रविवारी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघेल. पारंपारीक लोकवाद्यांसह जिल्ह्यातल सर्व लोककलावंतांचा व करवंड ग्रामस्थांचा सहभाग राहील. पहिल्या सत्रात सकाळी 9.30 ते 12 वाजेदरम्यान उद्घाटन, पुस्तक प्रकाशन व सत्कार समारंभ होईल. उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याहस्ते होणार आहे. सुप्रसिध्द  सर्जन तथा गझलकार डॉ.गणेश गायकवाड हे संमेलनाध्यक्ष आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.विलास देशपांडे, पुर्व संमेलनाध्यक्ष अजीम नवाज राही, श्यामभाऊ उमाळकर उपस्थित राहणार आहेत. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शेलसूरचे अध्यक्ष प्रा.सुनिल देशमुख हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. प्रास्ताविक प्रा.डॉ.अनंत सिरसाट करतील प्रा.डॉ.गोविंद गायकी भूमिका मांडणार आहेत. सुत्रसंचालन चंद्रशेखर जोशी तर आभार मुख्याध्यापक एस.टी.रिंढे हे करतील.
दुसछया सत्रात 1 ते 2.30 वाजेदरम्यान चर्चासत्र होईल. शेतकछयांच्या समस्यांवर मार्ग काढण्याठी शासनासह प्रसारमाध्यमे, लेखक, कलावंत उदासीन होत आहेत. या चर्चासत्रात वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर, आ.राहुल बोंद्रे, दै.देशोन्नतीचे आवृत्ती संपादक पत्रकार राजेश राजोरे, सुधीर देशमुख, कादंबरीकार दिनकर दाभाडे, साहित्यीक सुरेश साबळे सहभागी होणार आहेत. पत्रकार सचिन कापसे संवादक तर आभार पंजाबराव गायकवाड हे मानतील. संत गाडगेबाबा सभागृहात विशेष सत्रात बाल साहित्य मेळावा होईल. संयोजक सुभाष किन्होळकर राहतील. सुत्रसंचालन अनिल रिंढे, गणेश टाले करणार आहेत. 2.30 ते 3.30 च्या दरम्यान तिसरे सत्र होईल. यामध्ये नवोदीतांना भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एस.एम.कानडजे हे राहतील. प्रा.डॉ. सदानंद देशमुख, कवी, नाटककार, समीक्षक रविंद्र इंगळे चावरेकर यांचा सहभाग राहणार आहेत. संवादक सत्यपालसिंग राजपूत असून आभार प्रा.अनिल हेलगे व्यक्त करतील.
चौथ्या सत्रात दुपारी 3.30 ते 4.30 च्या दरम्यान कथाकथन होईल. अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. शोभाताई नाफडे उपस्थित राहणार आहेत. राम मोहिते, वंदना ढवळे, बबन महामुने, कडुबा बनसोड, साधना लकडे यांचा सहभाग राहील. सुत्रसंचालन अरविंद शिंगाडे तर प्रा.डॉ.संगिता पवार यांच्याकडे आभाराची जबाबदारी आहे. पाचव्या सत्रात समारोप तथा विशेष सत्कार समारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष डॉ.गणेश गायकवाड राहणार आहेत. आ.हर्षवर्धन सपकाळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, पत्रकार रणजीतसिंग राजपूत, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा.वाघ, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुत्रसंचालन प्रा.निशिकांत ढवळे करणार असून आभार प्रा.सुनिल देशमुख मानणार आहेत. सहाव्या सत्रात बहुभाषिक कविसंमेलन होईल. अध्यक्षस्थान सुप्रसिध्द गझलकार शिवाजी जवरे भुषवतील. सर्जेराव चव्हाण, सुदाम खरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. सुत्रसंचालन रमेश आराख तर आभार रविकिरण टाकळकर मानतील.