Breaking News

कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवणार : ठाणेदार मनोज केदारे

बुलडाणा, दि. 22 - जिल्हात  सर्वाधिक चर्चेत असलेले अंढेरा पोलीस स्टेशन ला नव निर्वाचित ठाणेदार पदी मनोज केदारे रुजू झाले आहे.त्या आधी कार्यरत किशोर जुनघरे हे ठाणेदार म्हणून अंधेरा येथे कार्यरत होते. भ्रष्टाचाराच्या आरोप खाली दबलेल्या या पोलीस स्टेशन ला अतिशय कर्त्यव्यदक्ष पने शिस्तिने आपले कर्तव्य पार पाडले व कसले हि गालबोट आपल्या कार्यकाळात लागू दिले नाही. त्यांना बुलडाणा येथे रुजू करण्यात आल्याने अंधेरा येथे मनोज केदारे यांची निवड करण्यात आली आहे.
केदारे हे या आधी वाशीम येथे कार्यरत होते. बुलडाणा जिल्ह्यात सैलानी रायपूर येथे केदारे यांनी दोन वर्षाचा काळ पूर्ण केला आहे. व अतिशय शिस्तप्रिय व नैतीक मुल्य जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून मनोज केदारे यांची ओळख आहे. रुजू झाल्यावर परिसरात कायदा सुव्यवस्था आबादीत ठेवणार तसेच ग्रामीण भागात जनतेशी थेट संपर्क साधत पोलीस व जनता यांचे वैचारिक रित्या जवळीक साधणार जेणे जरून गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटना कळायला सोपे जाईल असे मत लोकमंथन शी बोलतांना केदारे यांनी व्यक्त केले. माझ्या कार्यकाळात माझे कर्तव्य मी पूर्णपणे पार पाडेल व परिसरात होणार्‍या  गैर प्रकारावर नक्कीच अंकुश लावेल असे हि यावेळी ते बोलले.