मुलांना सक्षम बनविण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे : सुराणा
अहमदनगर, दि. 24 - यशस्वी पालकत्त्वाची निश्चित अशी व्याख्या नाही. मुलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक आई वडीलांचे आद्य कर्तव्य असले तरी मुलांचा सांभाळ करताना त्यांचा कलही लक्षात घेणे महत्त्वाचे असते. मुलांना यशस्वी करण्यासाठी आपली मते त्यांच्या लादण्यापेक्षा त्यांना स्वत:लाच आपली वाट निवडू द्यावी. सध्याचे युग स्पर्धेचे असल्याने मुलांना बाहेरच्या जगाशी ओळख करून द्यायला हवी. त्यांना एकट्याने संघर्ष करण्याची शिकवण दिली पाहिजे. यशस्वी पालक होण्यासाठी फक्त मुलांकडून अपेक्षा न ठेवता आपण त्यांच्याशी कसे वागावे याचा अभ्यास करायला हवा. त्यांना स्पर्धेच्या युगासाठी सक्षम बनण्यासाठी प्रोत्साहन द्या, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मॅनेजमेंट तज्ज्ञ व प्रेरणादायी वक्ते निलेश सुराणा यांनी दिला.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या रजत पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे जैन सोशल फेडरेशन आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित भगवान महावीर व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘प्रभावी पालकत्त्व’ या विषयावर सुराणा बोलत होते. उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी पालकांना पालकत्त्वाची नवी ओळख करून दिली. अनेक किस्से, अनुभव कथन करीत त्यांनी तब्बल दोन अडीच तास मार्गदर्शन करताना उपस्थितांना कधी हसवले तर कधी अंतर्मुख करायला लावले. प्रारंभी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.शरद कोलते यांच्या हस्ते सुराणा यांचा सत्कार करण्यात आला. अनिल मेहेर यांनी प्रमुख वक्त्यांच्या परिचय करून दिला. सरोज कटारिया यांनी स्वागत केले.
व्याख्यानाची सुरुवात करतानाच सुराणा यांनी परस्पर संवादातून समस्येवर तोडगा निघू शकत असल्याचे स्पष्ट केले. यातूनच त्यांनी पालकांना त्यांचे प्रश्न मांडण्यास प्रोत्साहित केले. मुलांची जबाबदारी कधीपर्यंत घ्यावी?, मुले घरी ऐकत नाहीत, सतत टि.व्ही.,मोबाईल, संगणक, इंटरनेटमध्ये व्यस्त असतात, खाण्यापिण्याकडे मुलांचे लक्ष नसते, मुले अजिबातच ऐकत नाहीत, कायम दंगा करायला आवडते अशा प्रश्नांसोबतच आमीर खानच्या दंगल चित्रपटाप्रमाणे कडक पालक होवून मुलांवर एखाद्या गोष्टीची सक्ती करावी का?, मुले सैराट होतायत मग पालकांनीही त्यांच्याप्रमाणेच सैराट व्हावे का? असे अनेक प्रश्न पालकांनी मांडले.