माणकचंदजी बोथरा यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान
अहमदनगर, दि. 24 - श्री बडिसाजन ओसवाल श्री संघ यांच्यावतीने पारस उद्योग समुहास नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट व्यावसायीक कार्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्ड मिळाल्याबद्दल संचालक माणकचंदजी बोथरा व पेमराजजी, संतोष व सतीश बोथरा यांचा संघाचे अध्यक्ष विलास लोढा यांच्या हस्ते विशेष गौरवपत्र देऊन नुकताच ओसवाल पंचायत भवन येथे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बडिसाजन ओसवाल पंचायत संघाचे पदाधिकारी सुंदरलाल भंडारी, सूर्यकांत धोका, धरमचंद कोठारी, सुमतीलाल कोठारी, विशाल शेटीया, अजित कर्नावट, रतीलाल कटारिया, रमेशचंद्र बाफना, मिलिंद जांगडा, सतीश लोढा, अनिल कोठारी, भानुलाल भंडारी, सुरेंद्र लोढा, नरेंद्र चोरडिया आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशनचे सचिव विशाल शेटीया यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व पारस उद्योग समुह व बोथरा परिवाराचे अहमदनगर शहराच्या औद्योेगिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या मोठ्या योगदानामुळेच त्यांचा नुकताच मुंबई येथे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याची जाणिव ठेवून समाजाच्यावतीनेही आज त्यांचा विशेष गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे, असे सांगितले.
संघाचे अध्यक्ष विलास लोढा यांनी आपल्या भाषणात बोथरा परिवाराचे सर्वच क्षेत्रात असलेले योगदान महत्वाचे आहे. त्याबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले. औद्योगिक क्षेत्रामध्ये भरभरुन प्रगती करीत असलेले बोथरा परिवारातील सदस्य औद्योगिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही तन-मन-धनाने आपले योगदान देऊन सामाजिक क्षेत्रातही मोठी उंची त्यांनी प्राप्त केली आहे. आज देश-विदेशातही पारस उत्पादनाने आपली बाजारपेठ काबीज केली आहे. या सर्व गोष्टी असूनही आपल्या सामाजिक क्षेत्रातील योगदान थोडीही कमी न करता वाढच केली आहे, ही बाब अभिनंदनीय असल्यास सांगून बोथरा परिवाराचे आभार मानले. या परिवारातील भावी पिढी चि.प्रणेश, रौनक, गौरव, रोहन, प्रथमेश, प्रसन्न हेही या व्यवसायाची धुरा सांभाळात आहे ही अतिशय मोलाची बाब असून, त्यांच्या पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.