जि.प.शाळेस मोरेवाडी शाळेस माजी मंत्री पाचपुते यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रदान
अहमदनगर, दि. 23 - श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज गावातील नव नवीन उपक्रमांसाठी प्रसिद्ध आणि नावाजलेल्या जि. प. प्राथमिक शाळा मोरेवाडी या शाळेस माजी मंत्री बबनराव पाचपुतेसाहेब व डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांचे हस्ते शाळेस खडज मानांकन शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नितीन बाबुराव भोईटे यांना आयएसओ संस्थेचे Best Implementation Award उरीव आदर्श शिक्षक पुरस्कार गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यदसाहेब यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी अजनुज गावातील ग्रामस्थांनी शाळेस भरगोस आर्थिक मदत दिली.
सविस्तर वृत्त असे की, अजनुज गावातील जि. प. प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या दरम्यान माजी मंत्री बबनराव पाचपुतेसाहेब व डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांचे हस्ते शाळेस खडज मानांकन प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमातून बेटी बचाव, बेटी पढाव तसेच पाण्याचे व्यवस्थापन या संबंधी संदेश देण्यात आला. यावेळी चिमुकल्या बालकलाकारांनी सादर केलेल्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणून देशप्रेम जागृत केले. या कार्यक्रमाच्या वेळी मोरेवाडी, अजनुज ग्रामस्थांनी एकतीस हजार रोख रुपये आणि शाळेसाठी आवश्यक साहित्य अशी पंच्याहत्तर हजाराची आर्थिक मदत केली. कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सय्यदसाहेब, विस्तार अधिकारी बोरुडेसाहेब, केंद्रप्रमुख हकीमसाहेब तसेच सरपंच शशिकला माळी, उपसरपंच सुदामराव गिरमकर, नानासाहेब शितोळे, सुरेश क्षिरसागर, सुर्यकांत मोरे, विजय गायकवाड, दत्तात्रय पाटील, धनंजय काळे, जालिंदर जगदाळे, गेनबा काळे, नारायण जाधव, अर्जुन क्षिरसागर हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडले मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक भोईटेसर यांनी मानले.