Breaking News

तंटामुक्त समितीची पहिली बैठक संपन्न

। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम । मढीत वैदु समाजाची जातपंचायती ऐवजी तंटामुक्त बैठक

अहमदनगर, दि. 23 - वैदु समाज्याने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाचे, पक्षाचे मेळावे निघत असतात. आम्ही देखील एकत्र येऊन आमच्या विचारांची देवानघेवान करु. अतिशय चांगला निर्णय या समाजाने घेतला आहे. असाच निर्णय ईतर समाज्यांनी घ्यायला पाहिजे असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी व्यक्त केले आहे.
 भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे होत असलेल्या जातपंचायतीवर न्यायालयाने बंधने आणल्यानंतर या समाजाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला. वैदू समाजाने जात पंचायती ऐवजी आता तंटामुक्तीच्या एकत्र येण्यास यावर्षी पासून प्रारंभ केला आहे. जात पंचायतीचे नवे रूप म्हणून तंटामुक्तीच्या बैठकाकडे पाहीले जात आहे. वैदु समाजाची पहिली तंटामुक्त बैठक काल मढी येथे शांततेत पार पडली. जातीनिहाय न्याय व्यवस्था कायद्याने बंद झाल्यानंतर वैदु समाजाने तंटामुक्तीचा निर्णय एकत्र येवून आपसातील तंटे मिटवण्यास प्रारंभ केला आहे. मढी येथे झालेल्या बैठकीमध्ये वैदु समाजाचे अखिल भारतीय वैदु पंचायत समितीचे अध्यक्ष डॉ. स्वामी शिरकुल वैदु, महाराष्ट्राचे अध्यक्ष शामलिंग शिंदे, मुख्य पंच चंदरबापु दासरजोगी, अशोक जाधव, तात्याराम धनगर यांनी तंटामुक्त समितीच्या रचनेची व कामकाज पद्धतीची माहिती दिली.
तंटामुक्त समितीच्या माध्यमातून देशातील वैदु समाजातील प्रश्‍न सोडविण्याचे काम करणार असून गरिब व मोठा असा मतभेद न करता सर्वांना समान न्याय देणार असल्याचे सांगितले.
यामुळे जातपंचायती ऐवजी तंटामुक्त समिती स्थापन करून न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी देशभरातून हजारो वैदु या बैठकीला उपस्थित होते. कालच्या तंटामुक्त समिती स्थापनेच्या निर्णयाचे राज्यभर स्वागत करण्यात आले. तर समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन वैदु पंचायतीच्या वतीने करण्यात आले.