कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने पिंपरी जलसेन यात्रात्सोची सांगता
अहमदनगर, दि. 23 - परिसरातील नामावंत मल्लांनी गाजवलेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाडयाने पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील गैबीपिरसाहेबांची यत्रोत्सवाची सोमवारी उत्साहात सांगता करण्यात आली.
दरवर्षी मोठ्या उत्साहात गैबीपीरसाहेबांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. रविवार व सोमवार असे दोन दिवस साजरा झालेला यात्रोत्सवाने पिंपरी जलसेन येथील वातावरण आनंदाने फूलुन गेले होते. शनिवारी रात्रि मुस्लिम बांधवांकडून संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव सहभागी झाले होते. रात्री गैबीपीरसाहेबांना चादर चढवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. रविवारी दिवसभर गैबीपिरसाहेबांच्या दर्शनासाठी अनेक हिंदू-मुस्लिम ग्रामस्थाणी हजेरी लावली. यातून हिन्दू-मुस्लिम एक्याचे प्रतिक पाहायला मिळाले. रात्री नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ शहाबुद्दीन पठान व डॉ सर्फराज पठान यांच्याकडून मुंबई येथील कलाकारांकडून भरदार कवाली गण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सोमवारी सकाळी रोकडोबा मंदिरासमोर साहेबराव पवार (बहीरोबावाडी) व नानासाहेब साळुखे(श्रीगोंदा) यांच्या कलगी-तुरा भेदिक पार्टिचा जंगी कार्यक्रम साजरा झाला. परिसरातील नामांकित मल्लांनी सोमवारी दुपारी पिंपरी जलसेन परिसर फुलुन गेला होता. सुमारे 4 तास चाललेल्या कुस्त्यांनी पिंपरी जलसेन येथे खर्या अर्थाने यात्रेचे स्वरूप आले होते. मालांनी केलेल्या दैदीप्यमान कुस्त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी माजी सरपंच लहू थोरात, सरपंच राजेंद्र थोरात, उपसरपंच संदीप काळे, विनोद कदम, बाळासाहेब वाढवने, आदिंसह ग्रामस्थ व परिसरातील नामांकित पैलवान उपस्थित होते.