वाहन चोरांचा शोध घेण्याची शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
। कोतवालीचे पोलिस निरिक्षक यांना निवेदन सादर
अहमदनगर, दि. 22 - शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल, महाविद्यालय, रुग्णालय आदि गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवावी व वाहन चोरांचा शोध घेण्याच्या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोतवाली पोलिस स्टेशनचे पो.नि. सोमनाथ मालकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, युवक शहराध्यक्ष अभिजीत खोसे, महिला शहराध्यक्षा रेशमा आठरे, वैभव ढाकणे, सारंग पंधाडे, अक्षय घोरपडे, अन्सार सय्यद, अजित गीते, ऋषीकेश ताठे, योगेश सोबले, प्रशांत ढलपे, विनोद खैरे, सागर गुंजाळ आदि उपस्थित होते.
वाडियापार्क क्रीडा संकुल येथे अहमदनगर प्रिमीअर लीग टी 20 क्रीकेटचे दिवस-रात्र सामने चालू आहे. हे सामने पहाण्यासाठी शहरातील व शहराबाहेरील क्रिकेट रसिक व खेळाडू मोठ्या संख्येने गर्दी करत आहे. या गर्दीचा फायदा घेत वाहन चोरांची टोळी सक्रीय झाली असून, येथून अनेक वाहने चोरीला गेली आहेत. तसेच काही वाहनांचा चोरीचा प्रयत्न झाल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रमाणे शहरात असलेल्या महाविद्यालय, रुग्णालय आदि गर्दीच्या ठिकाणी वाहनांची चोरी होत आहे. वाहन चोरीने सर्व सामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होवून, मनस्ताप होत आहे. वाहन चोरीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्याची व वाहन चोरांच्या टोळीचा शोध घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.